लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे आयोजन

या निमित्ताने शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक कार्यक्रम ठरणार खास आकर्षण

लांजा (प्रतिनिधी):तालुका मराठा संघाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे .या निमित्ताने सायंकाळी शिवप्रतिमेसह भव्य रॅली शहरातून काढण्यात येणार आहे.
लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते रात्र नऊ या वेळेत ही शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे .या निमित्ताने सायंकाळी ४ वाजता केदारलिंग मंदिर लांजा येथे शिवछत्रपती प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सामंत तसेच लांजा तहसीलदार प्रियांका ढोले,नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, दैनिक रत्नागिरी टाइम से संपादक उल्हास घोसाळकर , उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता शिवप्रतिमेसह
भव्य स्वरूपात रॅली काढण्यात येणार आहे .तर सायंकाळी ६.३० वाजता लांजा तहसील कार्यालया समोर शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे.तरी या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, आणि सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले आहे.