दापोली प्रतिनिधी : येथील उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे विविध आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे शिबिर पार पडणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये हर्निया (Hernia), अपेंडिक्स (Appendix), हायड्रोसील (Hydrocoel) या आजारावर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहेत. शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी ओपीडी क्रमांक ३ येथे रोज सकाळी १० ते १२ या वेळेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











