लांजा (प्रतिनिधी) : वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी रामगाव परिसरात वृद्ध महिला वैशाली हेगिष्टे यांच्या
खून करून सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रमोद खेडेकर याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील वेरवली लाडवाडी येथे १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करताना लांजा पोलिसांनी संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेतले होते. अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. तपासात चोरीच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाले होते.
आरोपीला यापूर्वी २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली













