२८ रोजी रत्नागिरीत “गुरुऋण” कार्यक्रम

गौरव पोंक्षे | माखजन :
रत्नागिरित, पंडित विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता “ओंकार आदिनाद फाउंडेशन” प्रस्तुत मुग्धनाद रत्नागिरी आणि रघुकुल स्वरविहार सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “गुरूऋण” कार्यक्रम आयोजित केला आहे.
गुरु पंडित विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांचे भारतातील तसेच परदेशात असलेले सर्व शिष्य आपापल्या गावी त्यांनी रचनाबद्ध केलेल्या बंदिशी गाऊन आमचा त्यांच्या प्रति असलेला आदर व श्रद्धा व्यक्त करीत आहोत. पंडित विकास कशाळकर यांनी अनेक परिचित व अपरिचित रागात सुमारे 200 बंदिशी बांधल्या आहेत. एक उत्तम गुरु, सांगितज्ज्ञ, रिसर्च गाईड,संगीतातील अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाषण करणारे वक्ता,ऊस डोंगा परी व निर्धार या संगीत नाटकचे लेखक, संगीतकार जे ग्वाल्हेर आग्रा व जयपसादे अभ्यासक आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवी सांगीतिक वाटचालीच्या निमित्ताचे औचित्य साधून सदरहू कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा व कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा अशी आयोजकान तर्फे नम्र विनंती करण्यात आली आहे.हा कार्यक्रम सौ मुग्धा भट सामंत, श्री प्रसाद भाटवडेकर, सौ नूतन परब तेजम, सौ मनाली दाणी बर्वे सादर करणार आहेत.तरनिवेदन डॉ अंजली दाणी करतील.तबला साथ श्री हेरंब जोगळेकर हार्मोनियम साथ कु श्रीरंग जोगळेकर करणार आहेत
हा कार्यक्रम २८रोजी सायंकाळी ६ वाजता गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे.प्रवेश विनामूल्य असून,या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.