राठीवडे येथे जल अर्पण योजना हस्तांतरण सोहळा संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर :जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती मालवण आणि ग्रामपंचायत राठीवडे यांच्या वतीने शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत पुर्ण झालेल्या योजनेचा जल अर्पण दिन व हस्तांतरण प्रक्रिया हा स्वाभिमानाचा उत्सव विविध उपक्रमांनी संपन्न झाला.या वेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण,राठीवडे सरपंच सौ. दिव्या धुरी, कनिष्ठ अभियंता अतुल माने, जिल्हा समन्वयक इंदिरा परब, उपसरपंच निखिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पुजारे, काजल धुरी, दिपाली धुरी, मनस्वी मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी विनोद रावले, माजी उपसभापती अरुण मेस्त्री,असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कींजवडेकर, बाळा सुरबा धुरी, कृष्णा पूजारे, गुरुदास पांचाळ, सिताराम धुरी, गंगाराम धुरी, अतुल तांबे,संतोष धुरी, देवानंद धुरी,उत्तम धुरी,भूषण धुरी,आत्माराम धुरी, रघुवीर धुरी,बचत गट महिला, ग्रामसंघ अध्यक्ष , सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व प्रथम ग्रामविकास अधिकारी विनोद रावले यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले.तर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सरपंच दिव्या धुरी यांनी सत्कार केला. त्यानंतर जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया सोहळ्याचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्या नंतर राठीवडे शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांचे समूहगान व प्रभात फेरी काढण्यात आली. महिलांची जलकलशासह जलदिंडी, सरपंच यांच्या हस्ते जलबंधण, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वांची जलशपथ, पाण्याचे महत्त्व आणि पाण्याचा योग्य वापर कसा करावा याचे संदेश देणारे विद्यार्थ्यांचे पथनाट्य आदी कार्यक्रम झाले. उपस्थित अधिकारी अतुल माने यांच्या हस्ते जल जीवन योजनेचे सरपंच दिव्या धुरी यांचेकडे हस्तांतरण, जलपूजन, पाण्याची गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिक जिल्हा समन्वयक इंदिरा परब यांनी दाखवून तपासणी मार्गदर्शन व कीट ग्रामसंघ महिला समिती गठीत करून त्यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.याचवेळी फ्रेंडशिप ग्रुप राठीवडे यांच्या वतीने राठीवडे शाळा नं१व गोंजीची वाडी शाळा नं.२साठी बँड साहित्य भेट देण्यात आले.व हरघर जलची‌ घोषणा करण्यात आली.तर जल जीवन योजनेचे पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून सरपंच दिव्या धुरी यांचेकडे जल अर्पण व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

त्या नंतर जल अर्पण कार्यक्रमास अनुसरून सरपंच दिव्या धुरी, जिल्हा समन्वयक इंदिरा परब, कनिष्ठ अभियंता अतुल माने,व पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले.तसेच शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राठीवडे ग्राम पंचायतीने कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकावल्या बदल सर्वांनी सरपंच आणि सहकारी यांचे अभिनंदन व कौतुक केले. शेवटी ग्रामविकास अधिकारी विनोद रावले यांनी सर्वांचे आभार मानले.