दोन चिमुकल्या आईविना पोरक्या…
प्रतिनिधी /रोहन कांबळे
राधानगरी:सोळांकुर (ता.राधानगरी) येथील सानिका गणेश पोतदार या विवाहतेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.सदरची विवाहिता प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकुर येथे दाखल झाली होती. प्रसूती सीजनल द्वारे करून तिने स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय (CPR) कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.मृत्यू झाल्याची बातमी समजताच गुरुवारी रात्री नातेवाईक आणि गग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी करत डॉक्टरांना घेराव घालून येथेच प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला. या मृत्युसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह हाती घेतला जाणार नाही असा पावित्रा धरला. सदर विवाहित सानिका पोतदार हिच्या जाण्याने अवघ्या १ दिवसाचे बाळ आईविना पोरके झाले.तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सोळांकुर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.ज्योती कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता प्रस्तुतीदरम्यान आमच्या टीमने अथक प्रयत्न करत बाळ सुखरूप बाहेर काढले.दरम्यान गर्भाशयात साठलेले पाणी रक्तवाहिकेतून हृदय व फुफुसामध्ये गेल्याने गुठळ्या निर्माण झाल्या व त्या गुठल्या निर्माण झाल्यामुळे श्वासोश्वास कोंडल्याने विवाहतेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.













