एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि अंतर्गत तक्रार समिती(ICC) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी श्रीम.कावेरी कासरलकर यांचे स्त्री सुरक्षा,मानसिक सक्षमीकरण आणि समाज जागृती या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या मार्गदर्शन सत्रामध्ये महिलांनी अत्याचारानंतर लढण्यापेक्षा अत्याचार होण्यापूर्वीच स्वतःची सुरक्षा कशी करावी,सजग कसे रहावे आणि मानसिकदृष्ट्या सक्षम कसे व्हावे,याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अंतर्गत तक्रार समितीच्या(ICC) अध्यक्षा सौ.सुप्रिया नलावडे,समन्वयक सौ.संध्या वायंगणकर, एआयएमएल विभाग प्रमुख तथा वुमन डेव्हलपमेंट सेल(WDC) अध्यक्षा सौ.प्राजक्ता राणे,डाॅ.शुभांगी माने,सौ.हेमंता साटेलकर इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी सौ.प्राजक्ता राणे यांनी अंतर्गत तक्रार समितीचे (ICC) काम कश्या प्रकारे चालते,त्याचे उद्दिष्ट काय,याविषयी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम ICC व WDC या दोन कमिटी अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. ICC कमिटी विद्यार्थीनी सदस्य कु. आकांक्षा जठार, कु. गौरी भोसले, कु. मंजिरी तेली व WDC कमिटी विद्यार्थीनी सदस्य कु. काजल कुपळे यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी. एस. बाडकर यांचे या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब, अध्यक्षा सौ नीलम ताई राणे,उपाध्यक्ष माननीय आमदार निलेशजी राणे, सचिव माननीय नामदार मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.













