आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची विधानपरिषदेत मागणी
गौरव पोंक्षे माखजन:
महाराष्ट्र राज्यातील अनुदानित खाजगी शाळांमध्ये नेमलेल्या मानधन तत्वावरील शिपायांना ५ हजार इतकं तुटपुंज मानधन दिल जात.याविषयावर कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली.
सभागृहात बोलताना आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेतनेतर अनुदाना मधून जे तुटपुंजे मानधन शिपायांना दिले जाते त्यातून घर खर्च देखील चालत नाही.या मानधनात सरकार ने वाढ करावी अशी लक्षवेधी सूचना मांडली.तसेच महाराष्ट्र राज्यातील स्वयं अर्थसहायित शाळेतील २५% आर.टी.इ अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रतिपूर्ती शुल्क अनेक दिवस प्रलंबित आहे.ते तात्काळ द्या अशी जोरदार मागणी केली.
लक्षवेधी ला उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यानी मांडलेल्या लक्षवेधी वर शासन लवकरात लवकर उचित निर्णय घेईल असे सांगितले.












