सावंतवाडी । प्रतिनिधी :
नॅशनल ऑलंपियाड फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. विज्ञान आणि सामान्य ज्ञान अशा दोन्ही विषयांत शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण १४ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.
नॅशनल सायन्स ऑलंपियाडमध्ये रुद्र गोसावी, प्रेम गावडे, ग्रंथा परब, विभास गवस, गिरीधर कोरगावकर (सर्व इ. १ली), विघ्नेश सावंत (इ. २री), पार्थ गोसावी (इ. ४थी) आणि पूर्वी राऊळ (इ. ६वी) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळवली.
तसेच, जनरल नॉलेज ऑलंपियाड परीक्षेत दुर्वांकुर आठलेकर, आदित्य पाटील (इ. २री), गार्गी सावंत (इ. ७वी), खुशी भगत, प्रज्वली गावडे, आयुष माळकर (तिघेही इ. ८वी) आणि सिया राऊळ (इ. ९वी) या सात विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या विद्यार्थ्यांना शिक्षक संदेश कळंगुटकर, सौ. संगीता सावंत व अमिता तिवरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, सी.ई.ओ. बाळासाहेब नंदीहळळी, उपाध्यक्ष नारायण देवरकर, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक समीर परब, संस्था पदाधिकारी व शिक्षक-पालक संघाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.











