दापोली–हर्णे रोडवरील राजलक्ष्मी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाशेजारील उपक्रमाने ग्राहकांचे लक्ष वेधले
दापोली प्रतिनिधी : दापोली तालुक्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात झालेल्या कपातीचा परिणाम स्थानिक हॉटेल आणि खानावळी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत काही उद्योजकांनी पर्यायी मार्ग अवलंबत ग्राहकांची सेवा अखंड ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दापोली–हर्णे रोडवरील राजलक्ष्मी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या तिर्था पोळी भाजी सेंटरने याच पार्श्वभूमीवर चुलीवर बनवलेल्या व्हेज व नॉनव्हेज पदार्थांची खास सोय सुरू केली असून या उपक्रमाकडे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.
गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसाय काही प्रमाणात मंदावला आहे. मात्र तिर्था पोळी भाजी सेंटरने या परिस्थितीला संधी मानत पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. चुलीवर तयार केलेल्या पदार्थांना मिळणारी खास धुरकट चव आणि पारंपरिक स्वाद यामुळे अनेक खाद्यप्रेमी या ठिकाणी आकर्षित होत आहेत. ग्रामीण पद्धतीची चव आणि घरगुती वातावरण यामुळे ग्राहकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
या सेंटरमध्ये सकाळच्या वेळेत चुलीवरील गरमागरम नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुपारचे व रात्रीचे जेवणासाठी विविध व्हेज तसेच नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. चुलीवर शिजवलेले मटण, चिकन, विविध भाज्या तसेच पारंपरिक मसाल्यांनी तयार केलेले पदार्थ ग्राहकांना वेगळाच स्वाद देत आहेत. या पदार्थांची चव आणि सुगंध यामुळे अनेक ग्राहक खास येथे येऊन जेवणाचा आनंद घेत असल्याचे दिसून येते.
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होत असताना तिर्था पोळी भाजी सेंटरने चुलीचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे केवळ व्यवसाय टिकवून ठेवण्यास मदत झाली नसून ग्राहकांनाही पारंपरिक चुलीवरील पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे. अनेक ग्राहकांनी या पदार्थांची चव गावाकडच्या घरगुती जेवणाची आठवण करून देणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दापोली–हर्णे रोडवरून प्रवास करणारे वाहनचालक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकही येथे थांबून नाश्ता व जेवणाचा आनंद घेत आहेत. चुलीवर बनवलेल्या पदार्थांमुळे या ठिकाणाची वेगळी ओळख निर्माण होत असून परिसरातील खाद्यप्रेमींमध्ये याबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे.
एकीकडे गॅस सिलेंडरच्या कपातीमुळे निर्माण झालेल्या अडचणी असतानाच दुसरीकडे या परिस्थितीतून नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न तिर्था पोळी भाजी सेंटरने केला आहे. पारंपरिक चुलीवर बनवलेले चविष्ट व स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज पदार्थ, गरमागरम नाष्टा आणि घरगुती जेवणाचा आनंद घेण्यासाठी दापोली–हर्णे रोडवरील राजलक्ष्मी ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाशेजारील या सेंटरकडे ग्राहकांची पावले वळताना दिसत आहेत.
याबाबत बोलताना हॉटेलच्या मालक सौ. पूजा भुवड यांनी सांगितले की, “ग्राहकांना चुलीवरील पारंपरिक चवीचे पदार्थ मिळावेत यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. व्हेज-नॉनव्हेजमधील सर्व प्रकारचा नाष्टा व जेवण ग्राहकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
गरमागरम आणि चुलीवरील खास चवीमुळे तिर्था पोळी भाजी सेंटर सध्या दापोली परिसरातील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे.













