ग्रामपंचायत अधिकारी कृष्णाजी दळवी यांचा खोटले येथे सन्मान!     

 

मसुरे | झुंजार पेडणेकर       :श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि सामाजिक न्यास, खोटले (प्रस्तावित) यांच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पोईप गावचे सुपुत्र तथा खोटले आणि वायंगवडे गावचे ग्रामपंचायत अधिकारी कृष्णाजी दळवी यांचा सन्मानचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन मठाधीपती गणेश घाडीगावकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मठाधिपती गणेश घाडीगावकर, खोटले सरपंच सुशील परब, कसाल सरपंच राजन परब, स्वामी समर्थ संस्थान समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य तसेच इतर मान्यवर आणि स्वामी भक्त उपस्थित होते. कृष्णाजी दळवी यांचा यापूर्वी सुद्धा चांगल्या कामाबद्दल विविध ग्रामपंचायत क्षेत्रात सत्कार झाला होता. दळवी यांनी त्यांचा सत्कार केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले यांचे आभार मानले.