मसुरे | झुंजार पेडणेकर : निवतीबंदर येथील श्री महाविष्णु मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २४ ते २६ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ रोजी सकाळी ८ वा. हरिपाठ, सायं. ५ वा. ग्रामस्थांची भजने, ६ वा. श्री पावणा
देवी समईनृत्य किंजवडे यांचे समई नृत्य , रात्री ९ वा. महापुरुष महिला भजनमंडळ तारकर्ली यांचे भजन.
बुधवार दि. २५ मार्च रोजी पहाटे
५ ते सकाळी ६ श्री देव महाविष्णु अभ्यंग स्नान , लघुरुद्र, अभिषेक व
यथासान्ग पूजन, भाविकांसाठी
श्रीचे दर्शन, १०वा. हरिपाठ, दुपारी
२ वा. श्रीसत्यनारायणाची महापुजा,
सायं. ६ ते ८ वा. ग्रामस्थांची भजने,
रात्रौ ९ वा. जयहनुमान दशावतार
नाट्यमंडळ मोचेमाड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग. गुरुवार दि.
२६ मार्च रोजी पहाटे ५ वा. काकड
आरती, दुपारी ११-३० वा. ग्रामस्थ
भजन, १२ वा. रामजन्म आरती,
१२-३० वा. महाप्रसाद, सायं. ५ वा.
हरिपाठ, ७ वा. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस यांचे दिंडी भजन, रात्रौ ९ वा. सातेरी
महिला दशावतार मंडळ, पावशी,
कुडाळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग ‘भक्तांची पाठिराखी आदिमाया’
या सर्व कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन विष्णुमंदिर समितीने केले आहे.












