देउड येथे हॅलोजन बदलत असताना विजेचा तिव्र धक्का बसून युवकाचा मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील देउड येथे घराच्या शेजारी लाईटचा हॅलोजन बदलत असताना विजेचा तिव्र धक्का बसून युवकाचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवार 9 जून रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास घडली.
जयराज संजय देसाई (19,रा.देउड,रत्‍नागिरी) असे विजेचा धक्का लागून मृत्‍यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी जयराज देसाई हा आपल्या घराच्या शेजारीच त्‍यांच्या गाडीच्या शेड जवळील चालू लाईनवर लाईटचा हॅलोजन बदलत होता. त्‍यावेळी त्‍याला विजेचा जोराचा धक्का बसल्यामुळे तो खाली पडून बेशूध्द झाला होता. ही बाब त्‍याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्‍यांनी जयराजला तातडीने जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍याला तपासून सायंकाळी 4.35 वा.सुमारास मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.