कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे महत्व पटवून दिल्यास उद्योजक उभे राहतील : जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; shaking: 0.0; highlight: true; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 38;

रत्नागिरी : 
जंगलात मुबलक सापडणाऱ्या करवंदावर प्रक्रिया करुन अनेक उत्पादने बनवून त्यातून शेतकरी संपन्न बनू शकतो. मात्र शेतकऱ्यांना त्याचे महत्व अद्याप कळलेले नाही. कृषी विभागाने यासाठी तालुक्यांमध्ये प्रशिक्षण शिबिर राबवून शेतकऱ्यांना महत्व पटवून दिल्यास उद्योजक उभे राहतील असे प्रतिपादन जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मे महिन्यामध्येच बियाण्यांचे वाटप करावे अशा सूचनाही त्यांनी कृषी विभागाला दिल्या.
रत्नागिरीतील जयेश मंगल पार्कमध्ये कृषी व आत्मा विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय खरेदीदार, विक्रेता संमेलन व फणस प्रक्रिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जि.प. अध्यक्षा बोलत होत्या. यावेळी त्यांनी कृषी विभाग आणि आत्मा विभागाने राबवलेल्या या शिबिराचे कौतुक केले. सुरुवातीलाच त्यांनी आयोजित कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांच्यासह अपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक पी. ए. बामणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दर्शन कानसे, पंचायत समिती सदस्य दादा दळी, कांचन नागवेकर, स्वाती शिंदे, अनुष्का खेडेकर, ॲड. अर्चना साळवी, विद्या बोंबले उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षा केंद्रे म्हणाल्या की, जंगली श्वापदांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर कृषी विभागाने मार्ग काढायला हवा. श्वापदांच्या त्रासामुळेही अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. करवंदा सारख्या रानात मोठ्याप्रमाणात येणाऱ्या फळावर प्रक्रिया झाल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी कृषी विभागाला दिल्या. यासाठी दोन-तीन तालुके एकत्र करुन प्रशिक्षणाची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पोहचणे सोपे जाईल असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत जून महिन्यामध्ये बियाणांचे वाटप केले जाते. मात्र तोपर्यंत अनेक शेतकरी मिळेल तिथून बियाणे घेऊन पेरणी करतात, त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या पहिल्या ते शेवटच्या आठवड्यापर्यंतच बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावेत असे त्यांनी सांगितले. योगेश कदम व पालकमंत्री उदय सामंत हे शेतकरी व बचत गटांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी चांगले काम करणाऱ्या अमृता पानगले, अपेक्षा पानकर, सागर निकम, बँक ऑफ इंडिया, आयडीबीआयसह, रत्नागिरी तालुका कृषी विभाग, रत्नागिरी कृषी विभाग यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बचत गट, छोटे उद्योजक यांच्याशी भैरवनाथ ट्रैडर्स या कंपनीशी एमओयू करण्यात आला.