रत्नागिरी ः प्रतिनिधी
घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या प्रौढाचा करबुडे पवारकोंड नदीच्या पात्रात मंगळवार 24 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास मृतदेह आढळून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिपक शांताराम गोणबरे (45,रा.उक्षी भेळी चिंचपार,रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. रविवार 22 मार्च रोजी सायंकाळी दिपक गोणबरे घरात कोणालाही न सांगता बाहेर निघून गेला होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली होती. दरम्यान, दिपकचा त्याचे नातेवाईक आणि पोलिस शोध घेत असताना मंगळवारी सायंकाळी करबुडे पवारकोंड नदीच्या पात्रात त्यांना दिपक मृत स्थितीत दिसून आला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












