बांदा | प्रतिनिधी : तळकट (ता. दोडामार्ग) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भिकाजी गोपाळ कोपकर (७५) यांचे राहत्या घरी १४ डिसेंबर रोजी निधन झाले. कोपकर गुरुजी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, वडदहसोळ तसेच दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, शिरवल, तळकट, फुकेरी, कुंब्रल आदी गावात त्यांनी विद्यादानाचे काम केले. अध्यापना सोबत त्यांना क्रीडा क्षेत्राचीही आवड होती. शेवटपर्यंत ते आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. आबा या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. निगुडे ग्रामपंचायत ग्रामसेविका सौ. तन्वी गवस, मालवण आगारातील मेकॅनिक अनंत कोपकर, योगेश कोपकर यांचे ते वडील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण कोपकर यांचे भाऊ तर कळणे येथील प्राथमिक शिक्षक तानेश्वर गवस यांचे ते सासरे होत.