मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे बांबरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा भजनी बुवा संभू जिवबा उर्फ आप्पा घाडी (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. देवी भगवती मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांचे देवीस कौलप्रसाद लावणे, गाऱ्हाणी घालणे आदी कामे ते करीत. ते उत्कृष्ट भजनी बुवा आणि नाट्यकर्मी होते. पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, मुलगी पुतणे, भावजय, नातवंडे पतवंडे आहेत. देवी भगवती देवस्थानचे विश्वस्त आनंद सावळाराम घाडी यांचे ते काका होत.













