चौके येथील डॉ.जाई पोळ यांना MBBS पदवी प्रदान

चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवाशी डॉ .जाई स्मिता संजय पोळ यांना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे वैद्यकीय क्षेत्रातील मानाची MBBS ही पदवी 27 मार्च 2026 रोजी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आली.

डॉ.जाई पोळ या डॉ संजय पोळ, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मालवण व पेंडूर कट्टा तसेच चौके येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.स्मिता संजय पोळ यांची कन्या असून त्यांचा जन्म कुडाळ येथे झाला.

डॉ.जाई यांचे प्राथमिक शालेय शिक्षण मालवण येथील रोजरी इंग्लिश स्कूल येथे झाले त्यानंतर शाहू कॉलेज लातूर येथे त्यांनी नीट कोचिंग चे प्रशिक्षण घेतले .त्यानंतर त्यांनी पुढील MBBS प्रवेश मेरिट ने डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्यानगर येथे मिळवला .

याच मेडिकल कॉलेजमधून डॉ.जाई यांना MBBS ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

डॉ.जाई यांचा भाऊ डॉक्टर प्रणव पोळ हे सुद्धा जन औषधी वैद्यकशास्त्रात BKL वालावलकर कॉलेज सावर्डे रत्नागिरी येथे पदव्युत्तरशिक्षण घेत आहेत तर वहिनी डॉक्टर प्रिया प्रणव पोळ – जाधव MBBS या वैद्यकीय अधिकारी गट A म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र चौके येथे कार्यरत आहेत. डॉक्टर जाई हिने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गेली अनेक वर्ष वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने डॉ.पोळ कुटुंबिय चौके येथे वास्तव्यास असल्याने संपूर्ण पोळ परिवाराचे ऋणानुबंध गावाशी जोडले आहेत . डॉ जाई यांच्या यशामध्ये सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे धन्यवाद मानले.