मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत हडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा हडकर, प. स.सदस्या योगिता कांबळी, सरपंच प्रकाश तोंडवळकर, उपसरपंच भारत लाड, ग्राम.सदस्य, भावेश सुर्वे,आनंद रावले,प्राची मयेकर आदी उपस्थित होते. हडी ग्रामपंचायत नेहमीच शासकीय योजना प्रभावी पणे राबवित असते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत आहे. आजची कौतुकाची थाप पुढील जीवनात निश्चित प्रेरणादाई ठरणार आहे असे प्रतिपादन यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी केले. यावेळी मान्यवरानी मनोगत व्यक्त केले. महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी श्रीमती हजारे ,कृषी सहाय्यक,श्री.विवेक रंगे,पोलिस पाटील,श्री, दिनेश सुर्वे,तृप्ती हडकर जान्हवी पांजरी, जेष्ठ नागरिक,श्री चंद्रकांत पाटकर, रवींद्र दांडकर, लवु पांजरी, वय वर्ष 90 असलेल्या श्रीमती ताराबाई नारायण शेडगे, सुरेश कदम ,सर्व अंगणवाडी सेविका,आरोग्य विभाग कर्मचारी,ग्रामपंचायत अधिकारी यूगल प्रभूगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी सागर गोलतकर,अजित मुळीक, पूजा सुर्वे, प्रगत शेतकरी किशोर नरे, हाटले,वराडकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश सुर्वे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर यांनी मानले.










