पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांचा कोंड्ये मधली वाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार

राजापूर प्रतिनिधी: राजापूर पंचायत समितीचे भाजपचे पंचायत समित सदस्य अभिजित गुरव यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोंड्ये मधली वाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोंडये येथील श्री गणेश मंदिरात गुरव यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर गुरव यांची भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपाचे कोंड्ये बूथ अध्यक्ष आणि कोंड्ये मधलीवाडीचे अध्यक्ष जयराम शिवगण यांच्या हस्ते गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनुसूचित जाती जमातीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. मारुती कांबळे यांची निवड झाल्याबद्दल गावचे मुख्य गावकर शांताराम शिवगण यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर भाजपचे राजापूर पूर्व विभागाचे तालुका अध्यक्ष एड. एकनाथ मोंडे, तालुका कार्यकारणी सदस्य एड. सुशांत पवार यांचाही कोंडये ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे शक्ति केंद्रप्रमुख प्रशांत मोंडकर,भाजप कोंड्ये बूथ अध्यक्ष संतोष धुरत, हातिवले बूथ अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, अजय लाड,मधु शिवगण, संतोष शिवगण, प्रकाश शिवगण, तसेच अन्य भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बोलताना गुरव यांनी कोंडये गावातील जनतेच्या समस्या व विकासकामांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी बूथ अध्यक्ष संतोष धुरत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.