कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील मठ गांगरकर गाव येथील घटना
लांजा (प्रतिनिधी) :गोवा के बिहार अशा जाणाऱ्या अज्ञात रेल्वेमधून खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर मठ गांगरकरगाव येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितूकुमार राजेंद्र दास असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून (हरपूर बोचहा, समस्तिपुर, विद्यापती नगर बिहार) येथील रहिवासी आहे. तो कोणत्यातरी रेल्वे मध्ये बसून गोवा ते समस्तीपुर बिहार असा चालला होता. ही ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील मठ गांगरकर गाव येथे आली असता आज गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रितूकुमार राजेंद्र दास हा धावत्या चालत्या रेल्वेमधून खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.











