राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील भालावली रातांबशेंडा येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ धाकू धोंडू बावदाने (७७) यांचे शनिवार ४ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने रहाते घरी निधन झाले. राजापूरचे वनपाल जयराम बावदाने यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थावावर अंत्यसंस्कार सायंकाळी ६ वाजता भालावली येथे होणार आहेत.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शेती व्यवसाय करताना त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. गावातील सामाजिक कार्यातदेखील त्यांचा कायम सक्रीय सहभाग असे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेत त्यांचे अंत्यदर्शन घतेले. व कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.












