विहिरीत पडला गावरेडा

 

हिवाळे गवळवाडी येथील घटना

मालवण | प्रतिनिधी : हिवाळे गवळवाडी येथील प्रदिप परब (मसुरकर) याच्या विहीरीत गवा रेडा पडल्याचे सकाळी त्या परिसरात चार कापण्यासाठी आलेल्या समिर पालव यांना दिसून आला. याबाबत माहिती पोलीस पाटील श्री. विरेन कदम यांनी वन अधिकारी यांना दिली आहे. गवा रेड्याला विहिरीतून बाहेर काढण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. डोंगर भागात झाडे आणि वेली यांनी ही विहीर आच्छादलेली आहे.