डॉ आंबेडकरांचे कार्य अथांग सागरासारखे : सचिन साठे

गौरव पोंक्षे माखजन:
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंदना परी झिजून,देशालाच नव्हे तर जगाला जगण्याची वेगळी दिशा दिली.डॉ बाबासाहेबांनी प्रत्येकाला समाजात माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करून दिली.डॉ बाबासाहेबांचे कार्य अथांग सागरासारखं असल्याचे प्रतिपादन सचिन साठे यांनी केले.ते माखजन इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,कै.सुलभा मोरेश्वर जोशी तंत्रशिक्षण विभागा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमानी साजरी झाली.यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली.
श्री साठे पुढे म्हणाले की बाबासाहेबांचे कार्य हे दिपस्तंभासारखे आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा जरी प्रयत्न केला तरी,उन्नती दूर नाही असा विश्वास व्यक्त केला.बाबासाहेबांच व्यक्तिमत्व नुसतं वंदनीयच नव्हे तर पूजनीय आहेत.त्यांच्या कार्याचा आपण जीवनात आदर्श घेऊया असे आवाहन केले.
मुख्याध्यापक महादेव परब म्हणाले,बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे तत्वज्ञ् होते.त्यांचं कर्तृत्व शब्दात मांडणे कठीण आहे.जगातील सुमारे ६५ हून अधिक देशात त्यांची जयंती साजरी होणे,यातच त्यांची म्हणता अधोरेखित होते अस नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे होते.यावेळी प्रशालेतील मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी तंत्रशिक्षण विभागाचे अधिव्याख्याते संतोष कुलकर्णी,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार नामजोशी यांनी केले.