गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिलीप जोशी यांचे निवासस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी दिलीप जोशी यांच्या सह ग्रामस्थ व शाळकरी मुले उपस्थित होती.दिलीप जोशी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेत,त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देखील विनम्र अभिवादन करण्यात आले.










