कॉलेजमध्ये सोनिया गवस प्रथम
दोडामार्ग | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून भेडशी ज्युनियर कॉलेजचा कला शाखेचा निकाल ७६.४७ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. बारावी परीक्षेसाठी एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा एकूण निकाल ८७.८० टक्के इतका लागला आहे.
कला शाखेत आकांक्षा काशिनाथ च्यारी हिने ५४.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सिया चंद्रकांत नाईक (५२.१७) हिने द्वितीय तर रोशन सखाराम देसाई (५१.५०) याने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत सोनिया अर्जुन गवस हिने ८५.८३ टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. यश्वर्या सगुण नाईक (७६.५०) हिने द्वितीय आणि तन्मय रमेश लोंढे (७२.५०) याने तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेतील दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला. कला शाखेत प्रविष्ठ १७ विद्यार्थ्यां पैकी १३ उत्तीर्ण तर ४ अनुत्तीर्ण झालेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नाईक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.












