लांजा (प्रतिनिधी) सव्यसाची गुरुकुलम् आणि शिवगंध प्रतिष्ठान, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १७ ते २४ मे या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या पटांगणावर पार पडणार आहे.या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना व तरुणांना भारतीय पारंपरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमिनमस्कार, शस्त्रविद्या, लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, तलवार अशा विविध युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याबरोबरच ज्ञानप्रबोधन चिंतन वर्गाचेही आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा प्रेरणादायी परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जाणार आहे.या उपक्रमामुळे तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्वसंरक्षणाची जाणीव आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शिबिरा बाबत अधिक माहितीसाठी संदीप सावंत (८४६८९६८६१०), मंगेश (पप्पू) मुळे (९२८४५१३०९९), अविनाश (राजू) जाधव (८८०६६३५७७८) तसेच प्रल्हाद साळुंके (७७३८७१६९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले












