आवळेगाव हायस्कूलचा बारावीचा निकाल जाहीर; मैथिली लोट व अनुशा कदम प्रथम

कुडाळ :     येथील आवळेगाव हायस्कूल, कला वाणिज्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे.

वाणिज्य व संयुक्त शाखेतून कुमारी मैथिली उल्हासलोट हिने 83.50% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कुमारी पूर्वी सुनील साळवी हिने 81.50% गुणांसह मिळवला. तृतीय क्रमांक अर्पिता विष्णू सावंत तसेच मयुरी पांडुरंग घाडी यांनी विभागून मिळवला.

कला शाखेत कुमारी अनुशा साईप्रसाद कदम हिने 66% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी संतोषी जयंत टक्के हिने 53% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर वेदिका समरसिंग त्रिंबक कर आणि विनोद विवेक परब यांनी 49.67% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या तसेच संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.