विरण वीज वितरण उपकेंद्राची ‘शंभर नंबरी’ कामगिरी; सर्व कर्मचाऱ्यांचा दिमाखदार सत्कार!

मसुरे | झुंजार पेडणेकर : लोकसेवेचा वसा घेत असताना, दिलेल्या जबाबदाऱ्यांचे शंभर टक्के पालन करणे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असते. आज वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या अहोरात्र परिश्रमातून आणि जिद्दीतून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला आहे. या यशाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टांना दाद देण्यासाठी आजचा हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन वीज वितरणचे कंपनीचे सहायक शाखा अभियंता श्री. प्रमोद मारबते यानी येथे केले. वसुलीचे उदिष्ठ शंभर टक्के पूर्ण केल्या बद्दल वीज वितरण कंपनीच्या विरण कार्यालया अंतर्गत सर्व लाईन स्टाफचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ठेकेदार

श्री. गणेश गोवेकर, मालवण वरिष्ठ प्रधान तंत्रज्ञ एम.के. चव्हाण,

कणकवली सबस्टेशन चे श्री. मालंडकर, विरण ऑपरेटर नितीन मारगुडे, पत्रकार श्री सुधीर पडेलकर, श्री प्रवीण धामापूरकर , स्मिता वंजारे, गोपाळ राठोड, लाईन स्टाफ महेन्द्र घाडी, स्वप्नील धामापुरकर, संदीप परब, प्रफुल्ल परब, कृष्णा ऊर्फ अमीत बागवे, बळीराम गावकर, सचिन परब, वैभव भोगले, दर्शन गिरगावकर, रुपेश लाड, प्रदीप परब, श्री. शिंदे आदी उपस्थित होते.

विरण शाखा कार्यालय प्रथमच गुणगौरव सोहळा पार पडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात खुपच उत्साही वातावरण पसरले. विरण शाखेचे अधिकारी प्रमोद मारबते यांचे कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले.

विज वितरण कंपनीच्या प्रत्येक कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून देणारे श्री प्रवीण परब (कराचीवाले) व प्रफुल्ल परब (कराचीवाले) यांचेही विज वितरण कंपनीच्या वतीने आभार मानण्यात आले.