वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट व थिंक शार्प फाऊंडेशनचा पुढाकार
चिपळूण (प्रतिनिधी) : मुलांना मुख्य प्राथमिक शिक्षण,आरोग्य व योग्य पोषण होणे बाल वयात आवश्यक असते, परंतु घाणेखुंट येथील गवळीवाडी अंगणवाडीमध्ये काहीशी वेगळी स्तिथी होती. गेली १४ वर्षे ही अंगणवाडी इमारतीअभावी एका घराच्या पडवीमध्ये सुरू होती. ग्रामपंचायत व गावाने अथक प्रयत्न सुद्धा यासाठी केले. याच दरम्यान वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट व थिंक शार्प फाऊंडेशन च्या CSR माध्यमातून एक अद्ययावत इमारत उभी केली. ज्यामध्ये मुलांना स्वतंत्र खोली, चित्राद्वारे रंगवलेली संपूर्ण इमारत, किचन, स्टोअर रूम व खेळणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उद्घाटनासाठी ऑस्ट्रिया ह्या देशांमधून कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सीक्युटिव्ह मिस. अन्ग्रेट बिचेरल आल्या होत्या.
याप्रसंगी मुलांना जुन्या अंगणवाडीतून नव्या अंगणवाडीत स्वागत करीत प्रवेश करण्यात आला.त्याचबरोबर वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट चे व्यवस्थापकीय संचालक श्री. पी. सुरेंद्रकुमार, श्री.शंकर के, सचिन पाटील, सतीश चव्हाण, शैलेंद्र ढवळे, रोशनी आचार्य व थिंक शार्प चे संतोष फड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. घाणेखुंट चे सरपंच श्री. राजू ठसाळे यांनी कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. एक वेगळे समाधान ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका मुलांच्या चेहऱ्यावर दिसल होते व या कार्याबद्दल कंपनीचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.










