माखजन इंग्लिश स्कूल चा दहावी चा निकाल ९६.५१%

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल चा इयत्ता दहावी चा निकाल ९६.५१% लागला आहे.
यामध्ये दिव्या दयानंद जड्यार हिने ९०.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवला.दिव्या ही अतिशय हुशार विद्यार्थिनी असून अष्टपैलू आहे.दिव्या ने मनाचे श्लोक पठण स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता.तसेच प्राची प्रसाद हेमण ८८.८०% मिळवत द्वितीय आली.तर इशिता नरेंद्र भागवत, कीर्ती कृष्णा पाटील ह्या दोघीना ८८.४०% गुण मिळाले व त्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांना महादेव शिंदे,गणेश शिंदे,संतोष कुलकर्णी,ओंकार नामजोशी,अंबादास घाडगे,चंद्रकांत चाचे,सुशील दिंडे,विठ्ठल भोईर,कांचन जंगम, रुही पाटणकर,मानसी कोवळे,आदीनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक महादेव परब,संस्था अध्यक्ष मनोज शिंदे सचिव श्रीकांत फाटक आदिसह अन्य संचालक यांचे कडून अभिनंदन होत आहे.