सिंधुदुर्गचे माणिकमोती : वायंगणी (मालवण)चे वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे

सिंधुदुर्गचे माणिकमोती -डॉ.बाळकृष्ण लळीत 

 मालवण-आचरा मुख्य रस्त्यावर १६ कि.मी. अंतरावर वायंगणी गाव आहे. वाटेत कोळंब,ओझर- (ब्रह्मानंद स्वामींची समाधी) हडी ,कालावल ही गावे लागतात. गावात वायंगणी शेती मोठ्या प्रमाणावर होते. पूर्वी होत असावी.. (वेंगुर्ल्याला सुद्धा वायंगणी नावाचे गाव आहे.) ग्रामदेवता ठाणेश्वर,रामेश्वर,रवळनाथ ही मंदिरे आहेत. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला गावातून जाणाऱ्या रस्त्याने रवळनाथ मंदिर आणि ग्रामपंचायत इमारत मिळते.

ग्रामपंचायत इमारतीच्या थोड पुढे प्राथमिक शाळेकडे जाणारा डाव्या बाजूचा अरुंद वळणाचा रस्ता लागतो.त्या रस्त्याने अंदाजे २५० मीटर अंतरावर प्राथमिक शाळेच्या पलीकडेच ऋग्वेद गुरुकुल ही गुरुजींची पाठशाळा आहे..

पाठशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ४ खोल्या आणि चिरेबंदी घर तसंच गोशाळा असा एकंदरीत परिसर आहे..

या परिसरात पेरू,जाम, फणस, चिकू तसंच माड, आंब्याची आणि काजू इत्यादी झाडं विपुल प्रमाणात आहेत.. कोकणातल्या पारंपारिक कौलारू घरांप्रमाणे समोर अंगण,ओटी,माजघर, स्वयंपाक घर,देवघर आणि पडवी तसेच तीन खोल्या अस घराचं स्वरूप आहे.

” शांत स्वभाव,मितभाषी, विद्यार्थ्यांवर वेदाभ्यासाखेरीज समाजातील दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा ही संस्कार करण्याकडेही तितकाच लक्ष,विद्यार्थी अभ्यासू बनवण्यासोबतच माणूस म्हणून समृद्ध जीवन जगण्यासाठी त्याला तयार करण्यावर विशेष भर देतात. त्यांना प्रसिद्धी आवडत नाही. असे गुरुजींचे गुण मला भावले.”असे मला गौरिश काजरेकर म्हणाले. गुरु -शिष्य परंपरेनुसार विद्यार्थ्यांचे गुरुजी,त्यांचे गुरुजी, त्यांचे गुरुजी या कोणाच्याही नावाला, नावलौकिकाला साजेल, शोभेल असा अभ्यास आणि वागणं विद्यार्थ्यांकडून करवून घेणं यासाठी गुरुजी सदैव प्रयत्नशील आणि तत्पर असतात. या गावात स्वतः मुरवणे गुरुजी, २ मुलगे, मोठा मुलगा श्रीराम गोव्याला कवळे पाठशाळेत अध्यापक म्हणून कार्यरत तर दुसरा वायंगणीला घरीच पाठशाळा सांभाळण्यात गुरुजींना मदत करतो..सुना आणि ४ नातवंडं अस कुटुंब असणारे असे मुरवणे गुरूजी व त्यांचे कार्य नक्कीच प्रेरक आहे. *गुरुजी आणि त्यांचे कार्य-*

वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी है वैदिक परंपरेचे निष्ठावान उपासक आणि प्रख्यात वेदोपासक म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य प्रामुख्याने वेद शिक्षण आणि संवर्धनावर केंद्रित आहे.

श्री दत्तात्रेय महादेव मुरवणे यांच्या वडिलांचे नाव महादेव विष्णू मुरवणे तरआईचे नाव शोभाताई. गुरूजींचा जन्म २५/०२/१९६५ रोजी

वायंगणी, तालुका मालवण येथे झाला. प्राथमिक शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुणे येथील तांबडी जोगेश्वरी पाठशाळेत वेदमूर्ती दिनकरभट्ट माधव फडके गुरुजी धनपाठी यांच्याकडे ऋग्वेदाचे दशग्रंथ घनांत अध्ययन पूर्ण केले व पुढे

१९९१ आणि १९९२ अशी दोन वर्षे त्यांनी नाशिक येथील गुरुगंगेशवर वेद‌विद्यालयात अध्यापन केले.१९९३ पासून त्यांनी आपल्या मूळ गावी, वायंगणी आले व तेथे ऋग्वेद गुरुकुल सुरू केले आणि तेव्हापासून तेथेच वेदोपदेश करत आहेत.

*गुरुकुलाचे कार्य आणि यश-*

त्यांच्या गुरुकुलातून आत्तापर्यंत१६-१७ विद्यार्थ्यांनी दशग्रंथ घनांत अध्ययन पूर्ण केले. आहे.यातील अनेक विद्यार्थी सध्या वेदशास्त्र अध्यापनाचे कार्य करत आहेत.सध्या त्यांच्या गुरुकुलात सुमारे तीस विद्यार्थी वेदाध्ययन करत आहे. *सन्मान आणि पुरस्कार-*

त्यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘कवि कुलगुरू कालिदास संस्कृत साधना पुरस्कार हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांना ‘वैदिक सम्राट् पं. श्रीकृष्णशास्त्री गोडशे गुरुजी राष्ट्रीय पंडित पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे. (नाशिक येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय (गुरुकुल, वेद पाठशाला) येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.)

*अन्य धार्मिक कार्य-*

ते विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात आणि मार्गदर्शन करतात.उदाहरणार्थ-त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद संहिता स्वाहाकार यांसारखे मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी हे भारतीय संस्कृतीचा आत्मा असलेल्या वेदवाङ्मयाची परंपरा निष्ठेने जपण्याचे आणि संवर्धित करण्याचे पवित्र कार्य करत आहेत. वेदमूर्ती दत्तात्रेय मुरवणे गुरुजी यांनी वेद शिक्षणाच्या संवर्धनासाठी आपल्या मूळ गावी या पाठशाळेची स्थापना केली.गुरुकुलाची १९९३ पासून त्यांनी या गुरुकुलाची सुरुवात केली. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेनुसार वेदवाङ्गयाचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि ऋग्वेदाचे शिक्षण देणे.

अध्यापनाचा विषय ऋग्वेद हा आहे.या गुरूकुलाची अध्ययनाच्यापद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना ‘दशग्रंथ घनात अध्ययन’ पर्यंतचे शिक्षण दिले जाते. यामध्ये ऋग्वेदाची संहिता (मूळ मंत्र) आणि त्याचे विविध पाठ (जसे की पद, क्रम, जटा, घन इ.) तरोच वेदाशी संबंधित इतर पूरक ग्रंथ (उदा.शिक्षाकल्प, व्याकरण,निवृत्त, छंदशास्त्र, ज्योतिष) यांचे शिक्षण दिले जाते.ही पाठशाळा घनपाठी शिष्यांना तयार

करण्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे ज्यांना वेदाचे अत्यंत कठीण आणि विस्तृत पाठ (धनपाठ) तोंडपाठ असतात.

गुरुकुलाची फलनिष्पत्ती

अशी की,आत्तापर्यंत (२०२६ पर्यंतच्या माहितीनुसार) त्यांच्याकडील १६ ते १७

विद्यार्थ्यांनी दशग्रंथ घनांत अध्ययन यशरवीरित्या विद्यार्थ्यांनी दशग्रंथ घनांत अध्ययन केले आहे. त्यातील आठ जणांनी कंठस्थ घन पारायणे देखील केली आहेत.सध्या (२०२६पर्यंतच्या माहितीनुसार) सुमारे तीस विद्यार्थी या गुरुकुलात वेदाध्ययन करत आहेत.

गुरूजींचे महत्त्वाचे योगदान असे की, गुरुकुलातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देशात विविध ठिकाणी वेद व शास्त्र अध्यापनाचे कार्य करत आहेत,ज्यामुळे वैदिक परंपरेचे संरक्षण आणि प्रसार होत आहे. गुरुजींनी स्वयंस्फूर्तीने कोकणातील या दुर्गम भागात गुरुकुल चालवून वैदिक ज्ञान परंपरेची ज्योत तेवत ठेवली आहे.गुरुर्जीनी वैदिक परंपरेच्या संवर्धनासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ————————————संदर्भ -नारायण मुरवणे,गौरिश काजरेकर (मालवण) यांच्याशी केलेला संवाद.