रिगल पब्लिक स्कूल (सीबीएससी ) १२ वीचा निकाल निकाल शंभर १००%

चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल पब्लिक स्कूल (सीबीएससी ) १२ वीचा निकाल १०० टक्के लागला असून १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी महाविद्यालयाने कायम राखली आहे.
कॉमर्स विभागातून कुमारी मुस्कान इम्रान झोंबडकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुमार आयुष योगेश शिंदे या विद्यार्थ्याने अनुक्रमे द्वितीय व कुमारी हिमगौरी सुबोध शिर्के या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सायन्स विभागातून कुमार झिदान परवेश पिरजादे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक कुमार मोहम्मद सुफियान झुबेर नायकोडी या विद्यार्थ्याने द्वितीय तर कुमारी संचना संदेश मोहिते या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला तर आज विभागातून सौरभ प्रकाश बेर्डे या विद्यार्थ्याने सुयश प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, संचालक अनिश शिर्के, संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याला देखील पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज कोंढे, गुहागर रोड, चिपळूण येथे फोन नंबर ७७६८९८८५८४ / ८३२९१०४८७६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.