दहावी परीक्षेत साहिल चव्हाणला ८०.८० टक्के गुण 

कणकवली:आयडीयल इंग्लिश स्कूल विद्यानगर, वरवडे या प्रशालेतील कु. साहिल रेवती रविंद्रकुमार चव्हाण याने एस.एस.सी (१० वी-इंग्रजी माध्यम) बोर्ड परिक्षेत ८०.८० टक्के गुण प्राप्त करीत यश संपादन केले आहे.

कुठल्याही खासगी क्लासेसला न जाता साहिल याने हे यश मिळविले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशामागे त्याच्या प्रशालेतील सर्व शिक्षक, आई, वडील, बहिण, आजोबा, आजी, काका, दोन मामा व आप्तेष्ट यांचा मोलाचा वाटा आहे. कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथील स. अधीक्षक रविंद्रकुमार चव्हाण याचे ते चिरंजीव होत.