चिपळूण (प्रतिनिधी) : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी DMLT नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संजीवनी कॉलेज तर्फे चिपळूण मधील हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यासाठी संजीवनी नर्सिंग कॉलेजचे शिक्षक वर्ग व GNM प्रथम वर्ष द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाचे विद्यार्थी यांच्या हस्ते हॉस्पिटल मधील परिचारीकांना सन्मानित करण्यात आले.
दवाखान्यातील पेशंटची सेवा करणाऱ्या, तसेच आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणी प्रश्नांशी झगडताना दवाखान्यातील पेशंटची हसत मुखाने काळजी घेणाऱ्या नर्सेस व ब्रदर्स यांच्या कार्याला मानाचा सलाम दिलाच पाहिजे. यासाठी चिपळूण मधील अपरांत हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, खेडकर हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल, श्रद्धा हॉस्पिटल, अवनीश हॉस्पिटल, Tulip हॉस्पिटल, वुमन्स हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल तसेच चिपळूण मधील जिल्हा रुग्णालय कामथे इत्यादी ठिकाणच्या नर्सेस व ब्रदर्स यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा त्रासलेला असतो. त्याच्या आरोग्याची, मनाची काळजी, त्याच्या जीवनात आनंद पसरवण्यासाठी परिचारिका सेवाकार्य करत असते. तिचे स्वतःचे जीवन सुद्धा आनंदमय, आरोग्य संपन्न आणि सुखकारक होण्यासाठी तिला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आजच्या या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त सर्व परिचारिकाना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी संजीवनी नर्सिंग कॉलेजचे राजीव कांबळे, आदिती पटवर्धन, वृषाली जाडे, निकिता जांभुळकर, तनवी साळवी, अर्चना कांबळे, नयना तांबे, मयुरी शिगवण, आकांक्षा मोहिते तसेच GNM नर्सिंगचे विद्यार्थी वर्ग या सर्वांनी मोलाचे कार्य केले. संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजतर्फे अशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.













