जि. प.शाळा लांजा नं. १ विद्यार्थिनी कु.चैतन्या कांबळे हिची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड

लांजा (प्रतिनिधी): पीएम श्री जिल्हा परिषद शाळा लांजा नं.१ ची विद्यार्थिनी कु. चैतन्या रमेश कांबळे हिची जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे .
कु. चैतन्या हिने कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले.जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये उत्तीर्ण होऊन तिने आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य,मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चैतन्या हिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.