रत्नागिरी : नाचणे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील नाचणे-एकता नगर येथील तरुणाने शनिवार 16 मे रोजी रात्री 9 वा. सुमारास खोलीतील फॅनच्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या
राहूल नंदकिशोर मुळे (३७, रा. एकता वसाहत, शांतीनगर-नाचणे, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत मुलाचे वडिल नंदकिशोर मनोहर मुळे यांनी दिलेल्या खबरीनुसार राहूल याला मायग्रेनचा त्रास होता. त्यामुळे त्याचे लग्न होत नव्हते तो नेहमी नैराश्येत असायचा शनिवारी तो घरीच होता. नंदकिशोर मुळे पत्नीसह सायंकाळी साडेपाच वाजता प्रथम चिरायु हॉस्पिटल येथे राहूल याची एमआरआय ब्रेन स्क्रिनींग टेस्टची चौकशी करुन आठवडा बाजार येथून घरी परत आलो. घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप होते. दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला तर राहूल दिसला नाही. तसेच आजू बाजुच्या परिसरात शोध घेतला. त्यानंतर पत्नी जिन्याने वरिल खेलीकडे गेली असता खोलीच्या दरवाजाला आतून कडी होती. त्यांनी शेजाऱ्यांच्या जीन्याने जावून खोलीचा मागील दरवाजा उघडला तर राहूल याने खोलीतील फॅनचे हुकाला नायलॉनचे दोरीने गळफास लावून लोमकळत होता. शेजारी व जमलेल्या लोकांनी राहूलला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.