गोवा येथे जावून केले रक्तदान.
ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथील आर्यन मयेकर या युवकाने अजिल्लो हॉस्पिटल येथे जात दुर्मिळ अशा बी नीगेटिव्ह रक्ताची गरज पूर्ण करत सामाजिक बांधिलकी जोपासली.म्हापसा येथे सोनाली सुनील पाटकर या मातोंड येथील महिलेला सीझरियन डिलिव्हरीच्यावेळी दुर्मिळ अशा बी निगेटिव्ह रक्ताची अत्यंत गरज होती. दुर्मिळ रक्तगट असल्याने या गटाचे काही मोजकेच रक्तदाते असल्याने हे रक्त मिळणे खूप कठीण होत अशातच उन्हाचा कडाका असल्याने रक्तदाते मिळण्यासाठी अडचणी येत होत्या.
ही माहिती मिळताच या पेशंटसाठी ओटवणे येथील आर्यन मयेकर यांनी कामावर असताना सुद्धा काम अर्धवट टाकून अजिल्लो हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व रक्तदान केले.
आर्यन मयेकर हे ऑन कॉल रक्तदाते संघटनेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते असून आजचे हे त्यांचे ऑन कॉल पाचवे रक्तदान आहे.
तत्पूर्वी सकाळी आपले मेडिकल स्टोअर बंद ठेऊन संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते बाबुराव मुळीक (कोंडूरा) हे देखील रक्तदान करण्यासाठी गेले होते. परंतु काही किरकोळ तांत्रिक कारणास्तव ते रक्तदान करु शकले नाहीत.
संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते देवेश परब व नितीन परब-तळवडेकर यांनी यासाठी मोठे सहकार्य केले. या सर्वांचे ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने आभार.व्यक्त करण्यात येत आहे तसेच प्रसंगाचे गांभीर्य दाखवीत गोवा येत धाव घेणाऱ्या आर्यन याचे ही पेशंट च्या नाते वाईका कडून आभार मानण्यात येत आहे.













