राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या चिपळूण तालुका अध्यक्षपदी अविनाश केळस्कर

चिपळूण महिलाध्यक्ष पदी सौ अरुता आडविलकर यांनी नियुक्ती

चिपळूण (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )पक्षाच्या चिपळूण तालुका अध्यक्षपदी माजी नगरसेवक अविनाश केळसकर यांची नियुक्ती करण्यात आली तर चिपळूण तालुका महिला अध्यक्षपदी अरुता आडवीलकर यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

चिपळूण येथील शिक्षक कर्मचारी पतपेढीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाच्या चिपळूण तालुका पदाधिकारी बैठक व कार्यकर्ते मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला निरीक्षक महेश चव्हाण , विजय देसाई, जिल्हाध्यक्ष सुरेश बने महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, शिरीष काटकर, सुजाता तांबे, महेंद्र कदम, यासीम खान, सतीश खेडेकर, अक्षय को, मुन्ना जसनाईक असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
याच कार्यक्रमात ओबीसी चिपळूण तालुका अध्यक्षपदी वासुदेव आप्पा मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. चिपळूण शहर अध्यक्ष पदी समीर देसाई तर चिपळूण राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षपदी मुन्ना जसनाईक आणि या चिपळूण शहर उपाध्यक्ष महिला अध्यक्षपदी दीपा कोतवडेकर यांचे नियुक्ती करण्यात आली.

यावेळी नूतन तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट पक्ष वाढवण्याची जबाबदारी खांद्यावरून घेतली असून ती प्रामाणिकपणाने पार पाडेन. पक्षाचे काम घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून निश्चितच पक्ष गावातील वाडी वस्त्यांवरती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीन. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या आणि चिपळूण नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना येणाऱ्या अडचण असतील याच्यावर सुद्धा तालुका अध्यक्ष म्हणून निश्चितच लक्ष देऊन काम करेन. पक्ष संघटना कशी वाढेल हाच माझा प्रयत्न असणार आहे. असे त्यांनी बोलताना सांगितले.