मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभितनाचे संगमेश्वरात पुन्हा मूल्यांकन करा

माखजन सरपंच महेश बाष्टे यांची मागणी

गौरव पोंक्षे माखजन:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे संगमेश्वर तालुक्यात फेर मूल्यांकन करा अशी मागणी माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांनी केली आहे.आता झालेले मूल्यांकन आणि गुणदान सदोष असून,आम्ही या पूर्ण प्रक्रियेवर असमाधानी असल्याचे महेश बाष्टे यांनी सांगितले आहे.
पंचायत समिती संगमेश्वर कडे ही मागणी केली आहे.या जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती सदस्य महेश उर्फ बावा जड्यार,सौ प्रिया सुवरे यांनी देखील संपूर्ण माहिती मागवली असून ,फेर मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे.
माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायात राज अभियानात ज्या सहा ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या, कडवई,ओझरे खुर्द,आंबेड बुद्रुक,माखजन,आंबव पोंक्षे,चोरवणे,आदिमध्ये माखजन ग्रामपंचायत सरस होती.हे सर्वश्रुत आहे.परंतु माखजन ग्रामपंचायतीला हेतूपुरस्कर कमी गुणदान करून ,मर्जीतल्या ग्रामपंचायतींना नंबर दिले असल्याचा आरोप महेश बाष्टे यांनी केला आहे.काही ग्रामपंचायतीला ज्या साठी गुण दिले आहेत ,त्या बाबी ,त्या ग्रामपंचातिनी खरंच पूर्ण केल्या आहेत का?त्या अस्तित्वात आहेत का?असा सवाल उपस्थित केला आहे.
मनापासून स्पर्धेची तयारी करून देखील पदरी,निराशा आल्याने महेश बाष्टे यांनी सदोष मूल्यांकन पद्धतीवर आसूड ओढले आहेत.ही प्रक्रिया नि:पक्षपाती पुन्हा राबवावी अशी मागणी महेश बाष्टे यांनी केली आहे.