उपाध्यक्षपदी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती,धैर्यशील माने…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.तर खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. केंद्र शासनामार्फत महावितरणाच्या माध्यमातून विविध विजविषयक योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही, या गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय विद्युत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याची विद्युत समिती गठीत करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या सर्व विद्युत विषयक योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करू आणि योजनांच्या अंमलबजावणी मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक वर आणू अशी ग्वाही दिली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांचा समितीत समावेश आहे.
दरम्यान विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्र शासनाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या विद्युत विषय सर्व योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
खासदार महाडिक यांच्या निवडीमुळे केंद्र शासनाच्या विविध योजना महावितरणाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचतील असे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.











