सन २०२५-२६ या वर्षामध्ये शासकीय सेवेत भरती झालेल्या उमेदवारांचा सन्मान करून वाढदिवस साजरा

चंद्रकात परवडी साहेब मित्रमंडळ, लांजा व कुणबी विकास पतसंस्था, लांजाचा नवा आदर्श

संतोष कोत्रे
लांजा -: आपल्या कार्यकर्तुत्वाने २०२५-२६ या वर्षामध्ये शासकीय सेवेत भरती झालेल्या तालुक्यातील तरुण-तरुणींचा यथोचित असा सन्मान करून व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
चंद्रकात परवडी साहेब मित्रमंडळ, लांजा व कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रकांत परवडी यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र यावर्षी हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षामध्ये तालुक्यातील जे तरुण तरूणी शासकीय सेवेत भरती झाले आहेत अशांचा सन्मान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कुलकर्णी काळे छात्रालय, लांजा येथे झालेल्या या कार्यक्रमात शासकीय सेवेत भरती झालेल्या संकेत मसणे- वनरक्षक बोरवली नॅशनल पार्क, लक्षदीप मसने -आर्मी, प्रमिला मसणे -रेल्वे पोलीस मुंबई, प्रथमेश सुवारे- सिंधुदुर्ग पोलीस दल, दीक्षा सुवारे- पोलीस दल पिंपरी चिंचवड, अभय दिवाळे- पोस्ट ऑफिस खेडशी, प्राची बंडबे – महावितरण रत्नागिरी, प्रणाली खूलम- अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय म्हसळा, अभिषेक तरळ- असिस्टंट लोको पायलट कोकण रेल्वे, अक्षय जोशी- ट्रॅक मेंटेनर कोकण रेल्वे रत्नागिरी, मयुरी बुरटे- पोलीस दल मुंबई, अक्षता खाके-महाराष्ट्र सुरक्षा दल, स्वप्ना दरडे -पोलीस दल वरळी मुंबई, प्रिया करंबेळे,-मुंबई पोलीस यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत परवडी, सौ. निलांबरी परवडी, सुरेश भायजे, सहदेव बेटकर, संभाजी काजरेकर, जयवंत शेट्ये, विजय खवळे, प्रसन्न शेट्ये, संजय सप्रे, सुधाकर कांबळे, प्रदिप कांबळे, वसंत घडशी, मारुती काका जोशी, सुरेश करंबेळे, विकास मांडवकर, विराज हरमले तसेच कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजाचे उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक शांताराम गाडे, आत्माराम धुमक, चंद्रकांत धनावडे, नंदकुमार आंबेकर, भालचंद्र कांबळे, बाळकृष्ण जोशी, संचालिका सौ. दर्शना बेंद्रे, व मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच संस्थेचे माजी संचालक सिताराम सांडम, वसंत बंडबे, अर्जुन वाघाटे, सुरेश गावडे, संस्थेचे स्थानिक कमिटी सदस्य राजू धामणे, शांताराम जाधव गुरुजी, आनंद पर्शराम, दिपक निवाते, मोहन पाडावे, काशिनाथ पोसकर, दिनकर हुंबरे तसेच संस्थेचे शाखाधिकारी संतोष घडशी, जयवंत खुलम, गंगाराम कालकर, सचिन रामाणे, महेश बर्वे, संभाजी डांगे, रोशन धनावडे, सुरज गावडे, रुपेश गोठणकर व संस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी, रिकरिंग प्रतिनिधी तसेच चंद्रकांत परवडी साहेब मित्रमंडळ लांजाचे सदस्य दिपक सावंत, दिलीप चौगुले, यशवंत निवदेकर, निलेश सुवारे, योगेश खावडकर, हरिश्चंद्र मणचेकर, विजय मोडक, एकनाथ करंबेळे तसेच संस्थेचे बहुसंख्य सभासद व हितचिंतक उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व उपस्थित सर्व मान्यवर तसेच तालुक्यातील सर्व स्तरावरून श्री.परवडी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रास्ताविक विलास दरडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर सनगरे यांनी तर आभार संदिप डाफळे यांनी आभार मानले.