देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम श्री. सचिन मनोहर अणेराव (करकोटवाडी) यांच्या पुढाकाराने आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर, आंगवली या ठिकाणी शनिवार दिनांक ६ जून,२०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वा. आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतील २४ शाळांमधील ७३१ विद्यार्थ्यांना एकूण ४,१०० वह्यांचे वाटप केले जाणार आहे. श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजिअस अँड चॅरिटेबल ट्रस्टकडून इयत्ता १ली ते ४थीच्या वर्गातील २६१ विद्यार्थ्यांना थ्री इन वन आकाराच्या प्रत्येकी चार वह्या, तर इयत्ता ५वी ते १०वीच्या ४७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा मोठ्या वह्या वितरित केल्या जाणार असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली आहे.











