ओटवणे येथील महादेव उर्फ जीजी मयेकर यांचे झाडावरून पडून दुर्दैवी निधन

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे शेरवाळवाडी येथील रहिवासी महादेव उर्फ जीजी अनंत मयेकर वय ७४ यांचे आंब्याच्या झाडावरून पडून दुःखद निधन झाले.काल ते आपल्या बागेतील आंबे काढण्यासाठी झाडावर चढले होते. त्यावेळी त्यांचा तोल जावून ते खाली पडले त्यात त्यांच्या डोक्याला, बरगडयांना, मार लागला होता.त्यातच मुकामारही लागल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत गोवा बांबूळी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे दुःखद निधन झाले.ओटवणे गावच्या अनेक सामाजिक उपक्रमातील सहभागा बरोबरच शेरवाळवाडी मंडळाचे ते जाणकर मार्गदर्शक होते तसेच गेले कित्येक वर्ष ते सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ओटवणे चे सक्रिय सभासद होते वाडीतील प्रत्येक कामासाठी, कार्यक्रमांसाठी त्यांचं मोठे सहकार्य असायचे त्यांच्या आकस्मिक जाण्याने एक धडपडी,समाजाप्रती जागृत असणारे आणि समाज कार्यात धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार व्यक्तीमत्व हरपल्याचे भावना व्यक्त होत आहेत.अत्यंत मनमिळावू, शिस्तप्रिय आणि अभ्यासू असणाऱ्या जीजी मयेकर यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या अकाली जाण्याने मयेकर कुटुंबियांवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,दोन मुलगे, सुना,तीन मुली,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील उमेश मयेकर,कृष्णकांत मयेकर यांचे ते वडील तर कीर्तनकार सुनील मयेकर यांचे ते भाऊ होय.