गौरव पोंक्षे माखजन:
गाव तेथे एसटी याप्रमाणे खेडेगावांना शहरांशी जोडण्याचे काम एसटी बस करत असते. सध्या बसेसची संख्या कमी आहे.परंतु बस सेवेवर अवलंबून असणाऱ्या तमाम प्रवाशांच्या विश्वासाला आगार व्यवस्थापक म्हणून कायम न्याय देणार व एसटी च्या ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असलेल्या ब्रीद वाक्यानुसार काम करत राहू असा विश्वास देवरुख आगार व्यवस्थापक सौ रेश्मा मधाळे यांनी व्यक्त केला. ग्रामीण जनतेचा आजही एसटी वर विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे त्यांनी नमूद केले.
श्रीमती मधाळे,माखजन बस स्थानकात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियान अंतर्गत माखजन बस स्थानकाचा मुंबई प्रदेश
स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने सहकार्य लाभलेल्या मंडळींचा आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या.त्या बोलताना पुढे म्हणाल्या की, माखजन बस स्थानक स्वच्छ सुंदर अभियानातून यश मिळवण्यासाठी माखजनचे सरपंच महेश बाष्टे, उपसरपंच सौ पूजा डेरे, ग्रामपंचायत सदस्य, माखजन दशक्रोशीतील तमाम जनतेच्या सहकार्याने या बस स्थानकाचा मुंबई प्रदेश विभागात क वर्गात द्वितीय क्रमांक मिळाला असून त्याचे स्वरूप पन्नास हजार रूपये, प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह आहे.त्यामुळे आपणा सर्वांची मी देवरुख आगार प्रमुख म्हणून ऋणी आहे.या समारंभात माखजन वाहतूक नियंत्रक अनिल चव्हाण प्रवासी संघटना कार्याध्यक्ष संतोष पाडळकर, वाहतूक नियंत्रक सुरेंद्र रहाटे, वाहक विजय कोंडविलकर, सफाई कर्मचारी समीक्षा पेढांबकर, माजी वाहतूक नियंत्रक संतोष जाधव,प्रवासी प्रतिनिधी लियाकत माखजनकर, निवृत्त कर्मचारी सतीश साठे, उमेश डेरे,रामदास डेरे, पत्रकार उदय अंब्रे, प्रमोद मांडवकर, मावळंगे सरपंच प्रकाश वीर, आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उमेश डेरे,संतोष पाडळकर, दिलीप शिंदे, सदानंद पवार,तुषार कोळी,लियाकत माखजनकर यांनी एसटी व कर्मचारी सेवा या बद्दल अनुभव कथन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर रेश्मा मधाळे, तुषार कोळी, अभियान प्रमुख सदानंद पवार माखजन सरपंच महेश बास ते उपसरपंच पूजा ढेरे सत्यवान माईन अनिल चव्हाण उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एसटी कर्मचारी अपूर्वा चव्हाण सुप्रिया शेळके अनघा खरवटेकर प्रिया दांडेकर अनुजा चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमा चे संपूर्ण सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.












