मुदत संपलेल्या व संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींचा समावेश
लांजा (प्रतिनिधी) सन २०२४, २०२५ या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आणि सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या आरक्षण पदाची सोडत निश्चित करण्यासाठी शनिवार दिनांक १२ जून रोजी त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत नियम १९६६ मधील सुधारित तरतुदीनुसार लांजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी १२ जून रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्यामध्ये बेनीखुर्द, जावडे, पालू, वाघणगाव, अंजणारी, माजळ ,वनगुळे, आसगे, विवली, कणगवली, साटवली, भांबेड, पन्हळे, इंदवटी, कोल्हेवाडी, खोरनिनको, गोळवशी, मठ, शिपोशी आणि कुरंग या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी १०.०० वाजता तर रावारी, वाडगाव, इसवली, विलवडे, आडवली, आणि हर्दखळे या ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३.०० वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे.













