मुंबई : टिळक नगर आणि चेंबूर च्या मध्ये डाऊन मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे. १०.१० वाजता ही ओव्हर हेड वायर तुटली होती जी ११ वाजताच्या दरम्यान दुरुस्त करण्यात आली. यामुळे एन गर्दीच्या वेळेला प्रवश्यांचा खोळंबा झाला. प्रवाशांनी रेल्वे रुळावर चालत पुढील स्थानक गाठले. मात्र आता वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.












