अधिक मासानिमित्त वेंगुर्ला माणिकचौक येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेला श्री पुरूषोत्तम याग व श्री सत्यनारायण महापूजे सह धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले.
पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ब्राह्मणांच्या मंत्रघोषात पुरूषोत्तम याग करण्यात आला. तसेच श्री सत्यनारायण महापूजाही पार पडली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होती. भाविकांनी श्री विठ्ठल-रखुमाई तसेच श्री पुरूषोत्तमाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. सायंकाळी भजनानंतर पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर महाआरतीने सोहळ्याची सांगता होणार आहे. जनकल्याण, सुखसमृद्धी आणि श्री पुरूषोत्तमाच्या कृपाशीर्वादासाठी आयोजित या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली, त्यामुळे परिसर भक्तीमय बनला होता.













