पळसंब येथे फार्मर आयडी कॅम्पला प्रतिसाद !

मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत पळसंब कार्यक्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांचे फार्मर आयडी काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी पळसंब ग्रामपंचायत सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, तलाठी श्रीम. सुवर्णा खुपसे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. शैलेंद्र अणावकर, केंद्र चालक श्री. घाडी, कु.अनुष्का सावंत, शेतकरी श्री. रमेश परब, श्री रविकांत पाडावे, श्री. कृष्णा सावंत, लक्ष्मण साईल, रामप्रसाद पळसंबकर, सुनेत्रा साईल, पंढरी परब, बाळा सावंत उपस्थित होते. मुंबईतून देखील मोबाईल द्वारे माहिती उपलब्ध करून फार्मर आयडी काढण्यात आले. शेतकरी यांचा चांगला प्रतिसाद कॅम्प साठी मिळाला.ग्रामस्थांनी सरपंच गोलतकर यांचे आभार मानले.