वेंगुर्ले : प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या विशारद पदवी परीक्षेमध्ये पखवाज या विषयांमध्ये वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील कु. श्रावणी परब हिने प्रथम श्रेणी प्राप्त केल्याबद्दल तिचे तुळस गावातील भजन प्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
तुळस येथील या कार्यक्रमाला जैतिराश्रित भजन मंडळाचे सदस्य प्रवीण कांदळकर, सचिन नाईक, सदस्य महेश आरोसकर, बुवा सिद्धेश नाईक, डॉ.दादा परब संगीत पखवाज विशारद यांचे शिष्य शामसुंदर राय, राजेश राय यांनी श्रावणी तसेच तीचे वडील बुवा श्री वैभव परब, आई सौ. वैष्णवी परब या सर्वांचे तसेच गावातील सर्व भजनी कलाकार व इतर ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले. तुळस पलतडवाडी येथील कु. श्रावणी परब ही संगीत विशारद मनीष तांबोसकर यांच्याकडे पखवाज चे शिक्षण घेत आहे. लहानपणापासून तिला पखवाज वादनाची व गायनाची आवड असल्यामुळे तिचे वडील बुवा श्री वैभव परब यांचेही मार्गदर्शन तिला लाभत आहे. सध्या ती बारावी मध्ये शिकत आहे.













